भुवनेश्वर
: अमेरिकन कंपनी एइएस कॉर्पोरेशनशी संबंधीत ओडिसा पॉवर जनरेशन कॉर्पोरेशन (ओपीजीसी)मधील 49 टक्के हिस्सा खरेदी करण्यासाठी अदानी पॉवर इच्छुक असल्याचे सांगण्यात येत आहे. ओपीजीसी ओडिसाच्या झारसुगुडा जिल्हय़ामधील बनहारपल्लीमध्ये 1,740 मेगावॅट क्षमतेच्या वीज निर्मिती प्रकल्पाचा समावेश आहे. हा प्रकल्प ओडिसामधील प्रमुख वीज प्रकल्प म्हणून ओळखण्यात येतो. कंपनीनुसार अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत 1,320 मेगावॅट क्षमता सध्या असून या प्रकल्पात 25 वर्षासाठी ग्रिडकोसोबत वीज खरेदीसाठी करार केला आहे.