ओपा जलशुद्धिकरण प्रकल्पाजवळ घटना
प्रतिनिधी / फोंडा
ओपा-खांडेपार येथील जलशुद्धिकरण प्रकल्पाजवळील परिसरात अडकलेल्या मगराला वनखात्यातर्फे जीवनदान देण्यात आले. सुमारे 400 किलो वजनाच्या 10 फुट लांबीच्या मगराची सुखरूप सुटका करण्यात आली. सदर घटना काल शुक्रवारी सायं. 3.30 वा.सुमारास उघडकीस आली. प्राप्त माहितीनुसार ओपा खांडेपार येथील जलशुद्धिकरण प्रकल्पाजवळ एकीचकडे हालचाली करीत असलेले संशयास्पद मगर काही ग्रामस्थांच्या नजरेस पडले. त्यानंतर वनखात्याला पाचारण करण्यात आले. वनखात्याची टिम घटनास्थळी दाखल होत महत्वाचे मदतकार्य केले. सदर मगर नर असून त्याचे वय अंदाजे 40 वर्षे असावे असा अंदाज वनअधिकाऱय़ांनी लावला आहे. याकामी वनखात्याचे दीपक बेतकीकर, प्रज्योत नाईक, हनुमंत नाईक, दीपा रेडकर, देऊ शेटकर, सचिन सावंत, रामा देरगुणकर, अक्षय गावस, संदेश गस्ती, अली साहब, दुर्गानंद नार्वेकर, किरण साळगांवकर, सुनिल मालदार व ग्रामस्थांनी अथक परिश्रम घेतले.