50 एमपी कॅमेऱयासह 5000 एमएएच क्षमतेची बॅटरी
नवी दिल्ली
ओप्पो कंपनीचा ‘ओप्पो के 10’ हा स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच झाला आहे. के आवृत्तीच्या पोर्टफोलियोमध्ये हा नवीन फोन सादर केला असल्याचे कंपनीने सांगितले आहे. यामध्ये स्नॅपड्रगन 680 एसओसी प्रोसेसरसोबत 8 जीबी रॅमची सुविधा उपलब्ध होणार असल्याचे स्पष्टीकरण कंपनीने दिले आहे. हॅण्डसेटमध्ये 6.59 इंच आकाराचा डिस्प्ले 90 एचझेड रिप्रेश मिळणार आहे. ओप्पो के 10 मध्ये 5,000 एमएएच क्षमतेची बॅटरी व 33 व्हॅट फास्ट चार्जिंगची सोय मिळणार आहे.
भारतीय बाजारातील मॉडेलची किमत
भारतामध्ये ओप्पो के 10 ची किमत 6 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेज मॉडेल 14,990 रुपयापासून सुरु होणार आहे. याच्या वरील मॉडेलची किमत ही 16,990 रुपये असणार असल्याचे नमूद केले आहे. सदरच्या स्मार्टफोनची विक्री29 मार्चपासून सुरु होणार असून फ्लिपकार्ट व कंपनीच्या ऑनलाईन स्टोअरवर खरेदी करता येणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे.
अन्य फिचर्स…
ओप्पो के 10 स्मार्टफोन अँड्रॉईड 11 वर चालतो
6.59 इंच आकारात पूर्ण एचडी डिस्प्ले
ट्रिपल कॅमेरा सेटअप
50 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा
वायफाय, 4एलटीइ, ब्लूटय़ूथ वाय5 व जीपीएस आणि 3.5 मिमी ऑडिओ जॅकचा समावेश आहे.