प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव येथील सुप्रसिद्ध वकील श्री.ओमप्रकाश भांवरलाल जोशी (नागोरी) यांनी नुकत्याच IBBI(Insolvency Bankruptcy Board of India) च्या वतीने घेण्यात आलेल्या LIE (Limited Insolvency Exam)या परिक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.कोरोनाच्या प्रदुभवामुळे झालेल्या लॉक डॉऊंनच्या काळाचा सदुउपयोग करीत जोशी यांनी हा अभ्यासक्रम पूर्ण केला .सहसा सदर अभ्यासक्रम हा चार्टर्ड अकाउंटंट अथवा कंपनी सेक्रेटरेट पदवीप्राप्त विध्यार्थी पूर्ण करतात पण जोशी हे पेशाने वकील असून देखील त्यांनी हे यश मिळविले असून insolvency professional म्हणून कार्यरत होणारे ते उत्तर कर्नाटकात तिसरे तर बेळगावातील एकमेव आहेत .येथील प्रसिद्ध सत्यनारायण जोशी (नागोरी) यांचे ते कनिष्ठ बंधू असून त्याच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.