ऑनलाईन टीम / लंडन :
कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटवर प्रभावी ठरेलेल्या फायझरच्या कोविड गोळीला युरोपियन युनियनच्या औषध नियामक विभागाने आपत्कालीन काळासाठी परवानगी दिली आहे. ही गोळी रुग्णालयात दाखल होणारे कोरोनाचे रुग्ण आणि कोरोनाबळींची संख्या कमी करण्यास 90 टक्के परिणामकारक आहे, असा दावा फायझरने केला आहे.
युरोपियन औषध नियामक विभागाने एका निवेदनात म्हटले आहे की, फायझरची कोविड टॅबलेट अद्याप युरोपियन युनियनमध्ये वापरास परवानगी नाही. मात्र, या टॅबलेटचा वापर प्रौढांवर कोरोना उपचार करण्यासाठी केला जाऊ शकतो. ज्या रुग्णांना पूरक ऑक्सजिनची आवश्यकता नाही आणि ज्यांना गंभीर आजार होण्याचा धोका वाटतो, अशा कोरोना रुग्णांवरील उपचारात फायझर कोविड टॅबलेट वापरण्यास मंजुरी आहे.
या गोळीमध्ये पॅक्सलोविड हे नवीन रेणू पीएफ-07321332 आणि एचआयव्ही अँटीव्हायरल रिटोनावीर यांचे संयोजन आहे. दरम्यान, आपत्कालीन वापरास परवानगी मिळणारी ही दुसरी टॅबलेट ठरली आहे. या आधीच औषध नियामक विभागाने मर्कच्या कोविड टॅबलेटसाठी आणीबाणीच्या वापरास मान्यता दिली आहे.