ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचे निदान करणाऱ्या डिटेक्शन किटला आयसीएमआरने मंजुरी दिली आहे. ‘ओमिशुअर’ असे या किटचे नाव आहे.
‘ओमिशुअर’ हे डिटेक्शन किट मुंबईस्थित टाटा मेडिकलने तयार केले आहे. हे किट एसजीटीएफ स्ट्रेटर्जीच्या माध्यमातून ओमिक्रॉन संसर्गाचे निदान करते. या किटच्या माध्यमातून ओमिक्रॉनचा संसर्ग झाला आहे की नाही याचे तात्काळ निदान होणार आहे. निदान होण्यासाठी वाट पाहावी लागणार नाही. अमेरिकेच्या थर्मो फिशरकडून या किटचे मार्केटिंग केले जात आहे.
दरम्यान, भारतात आतापर्यंत 23 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात ओमिक्रॉनच्या 1892 रुग्णांची नोंद झाली असून, त्यापैकी 766 रुग्ण बरे झाले आहेत. ओमिक्रॉनने महाराष्ट्रात सर्वाधिक 568, त्यानंतर दिल्लीत 382, केरळमध्ये 185, राजस्थानमध्ये 174, गुजरातमध्ये 152 आणि तामिळनाडूत 121 प्रकरणे नोंदविली आहेत.