सेन्सेक्स-निफ्टीत घसरण :एसबीआय व आयटीसी नुकसानीत
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय भांडवली बाजारात चालू आठवडय़ातील तिसऱया दिवशी बुधवारी बीएसई सेन्सेक्स जवळपास 91 अंकांनी प्रभावीत होत बंद झाला आहे. यामध्ये प्रामुख्याने एचडीएफसी बँक, स्टेट बँक आणि आयटीसी यांच्या समभागातील नफा कमाईमुळे घसरण राहिली आहे.
बाजारात दिवसभरातील चढउताराच्या दरम्यान प्रमुख कंपन्यांच्या मदतीने दिवसअखेर सेन्सेक्स 90.99 अंकांनी घसरुन 57,806.49 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टी 19.65 अंकांनी प्रभावीत होत 17,213.60 वर बंद झाला आहे.
दिग्गज कंपन्यांमध्ये भारतीय स्टेट बँकेचे समभाग सर्वाधिक एक टक्क्यांनी नुकसानीत राहिले आहेत. यासोबत आयटीसी, एनटीपीसी, टेक महिंद्रा, टाटा स्टील, कोटक बँक आणि महिंद्रा ऍण्ड महिंद्रा यांचे समभागही घसरणीत राहिले आहेत. दुसऱया बाजूला सन फार्मा, इंडसइंड बँक, डॉ.रेड्डीज लॅब आणि बजाज फिनसर्व्ह यांचे समभाग लाभासह बंद झाले आहेत.
जागतिक बाजारांमधील कल नकारात्मक राहिल्याने देशातील बाजारातील व्यवहारात चढउताराचे वातावरण राहिले होते. यासह वाढत्या ओमिक्रॉनचाही प्रभाव मोठय़ा प्रमाणावर भारतीय बाजारावर राहिल्याचे दिसून आले आहे.
यासह जागतिक पातळीवर विविध देशांमधून नवे नियम लागू केले जात आहेत. याच दरम्यान भारतामध्येही ओमिक्रॉनचा संसर्ग वाढत असल्यामुळे महाराष्ट्र व दिल्लीमध्ये काही निर्बंध लागू केले जाणार असून याचा परिणाम गुंतवणूकदारांवर पडल्याचे दिसून आले आहे.
जगातील अन्य बाजारात आशियातील प्रमुख बाजारांमध्ये चीनचा शांघाय कम्पोजिट, हाँगकाँगचा हँगसेंग, दक्षिण कोरियाचा कॉस्पी आणि जपानचा निक्की हे नुकसानीसह बंद झाले आहेत. युरोपीयन बाजारांमध्ये मिळताजुळता कल राहिला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल 0.11 टक्के वधारले होते.