ऑनलाईन टीम / नवी दिल्ली
ओमिक्रॉनच्या पार्श्वभुमीवर अमेरिकेच्या प्रमुख कंपन्यांनी त्यांच्या ऑफिस-टू-ऑफिस प्लॅनचे पुनर्मूल्यांकन सुरु केले आहे. तसेच लसीकरणासाठी आवश्यकतेनुसार कठोर नियमावली केली आहे. कारण ओमिक्रॉनच्या संसर्गाने महामारी सारख्या धोक्याचा संभव आहे. वेगाने पसरणारा हा नवीन प्रकार आला आणि चिंता निर्माण झाली आहे. या आव्हानांमुळे 100 पेक्षा जास्त कामगार असलेल्या कंपन्यांसाठी अमेरीका सरकारने महत्त्वाचे आदेश जारी केले आहेत.
याचबरोबर ब्रिटनमध्ये ही ओमिक्रॉन रुग्णांची संख्या वाढत आहे. यावरुन शास्त्रज्ञांनी पुन्हा मोठी लाट येण्याची लक्षणे दिसत असल्याचे स्पष्ट केले आहे. या पार्श्वभुमीवर ब्रिटनने शनिवारी ओमिक्रॉन कोरोनाव्हायरस प्रकाराच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचे स्पष्ट केले आहे. सरकारी सल्लागारांनी दिलेल्या माहिती प्रमाणे ही वाढ म्हणजे हिमनगाचे फक्त टोक असू शकते असे म्हटले आहे. आणि लंडनच्या महापौरांनी शहरातील रुग्णालयांना या धोक्याचा सामना करण्यास मदत करण्यासाठी “मोठी घटना” घोषित केली आहे.ब्रिटनमध्ये शुक्रवारी 1800 नोंदवलेल्या ओमिक्रॉन प्रकरणांची संख्या आज जवळपास 25,000 वर पोहोचली आहे.