ऑनलाईन टीम/तरुण भारत
कोरोना महामारीच्या लढाईदरम्यान ओमिक्रॉन या नव्या व्हेरियंटने जगाची चिंता वाढवली आहे. डेल्टा व्हेरियंटनंतर आता ओमिक्रॉन व्हेरियंटची दहशत जगभरात पसरली आहे. दक्षिण आफ्रिकेतून ओमिक्रॉन पसरल्याचे बोलले जात आहे. मात्र दक्षिण आफ्रिकेपूर्वीचे दोन देशांनी ओमिक्रॉन केस आढळल्याचे सांगितले आहे. ओमिक्रॉन हा व्हेरियंट दक्षिण आफ्रिकेतून नाही तर युरोपमधून पसरल्याचा नवा खुलासा झाला आहे. नेदरलँडच्या आरआयवीएम आरोग्य संस्थेने १९ आणि २३ नोव्हेंबरला नमुन्यांमध्ये ओमिक्रॉन आढळल्याची माहिती दिली आहे.