आरोग्यासह अन्य सुविधा कायम : भारतासह दक्षिण आशियातील कर्मचारी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मागील मार्च महिन्यापासून कोरोनाच्या संकटामुळे जगासोबत देशातील उद्योगधंदे प्रभावीत होत गेल्याचे पहावयास मिळाले आहे. या कारणामुळे बहुतांश कंपन्यांनी कर्मचारी कपातीसोबत वेतन कपातीवर मोठय़ा प्रमाणात भर दिल्याचे पहावयास मिळाले आहे. याप्रकारची घोषणा मागील काही दिवसात हॉस्पिटॅलिटी संस्था ओयो यांच्याकडून करण्यात आली होती. परंतु आता पुन्हा ओयोने आपल्या कर्मचाऱयांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला असून वेतन कपातीचा निर्णय मागे घेतल्याची घोषणा करत दिलासा दिला आहे.
कोविडच्या संकटाचा सामना करणाऱया ओयोने वेतन कपात आणि विना वेतन रजेवर काही कर्मचाऱयांना पाठविण्याचा निर्णय घेतला होता. त्याला आता पूर्णविराम मिळणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
वार्षिक आठ लाख रुपयांचे उत्पन्न असणाऱया कर्मचाऱयांची वेतन कपात एक ऑगस्टपासून मागे घेत असल्याचे कंपनीच्या सूत्रांनी सांगितले. यासोबतच अन्य कर्मचाऱयांची वेतन कपात ऑक्टोबर 2020 पासून मागे घेण्यात येणार आहे. वेतन कपातीमध्ये प्रामुख्याने भारत आणि दक्षिण आशियातील कर्मचाऱयांचा समावेश राहणार असल्याचे भारत व दक्षिण आशियामधील कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहित कपूर यांनी सांगितले आहे.
कर्मचाऱयांच्या सुविधा कायम
काही कर्मचाऱयांना मागील चार महिन्यांपासून रजेवर पाठविलेल्या कर्मचाऱयांना ओयोने मेडिकल इन्शुरन्स, शाळांची फी रीइंबर्समेंट सुविधा कायम ठेवल्या आहेत. याच्यासह सर्व कर्मचाऱयांच्या वेतनात एप्रिल ते जुलै 2020 मध्ये 25 टक्क्मयांनी कपात केली आहे.