प्रतिनिधी / मडगाव
हिऱयाच्या आणि सोन्याच्या दागिन्यासाठी लोकप्रिय असलेल्या ओरा ज्वेलर्सने मडगाव शहरात आत्ता खास ‘ओरा ब्राइडल ज्वेलरी’ शो-रूम कार्यान्वित केला असून काल रविवारी त्याचे उद्घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ओरा ज्वेलर्सचे सीसीओ सेसिल दे सांता मारिया, मार्केटिंग हेड सुजाता राव, विभागीय बिज्नस मॅनेजर विशाल मेहरा, एरिया बिज्नस मॅनेजर सुप्रिता नायक, स्टोअर मॅनेजर पराग रेवणकर, स्टोर मॅनेजर सेण्ड्रा डिसोझा इत्यादी मान्यवर उपस्थितीत होते.
कोरोना महामारीच्या काळात सुद्धा मडगाव शहरात ‘ओरा ब्राइडल ज्वेलरी शो-रूम’ सुरू होत आहे ही नक्कीच चांगली गोष्ट आहे. कोरोना महामारीमुळे सर्वच उद्योग धंदय़ाला फटका बसलेला असताना ज्वेलरी शो-रूमचे लोकांच्या सेवेसाठी उद्घाटन होणे ही आनंदाची गोष्ट आहे. यातूनच अर्थ व्यवस्थेत पुन्हा सुधारणा होत असल्याचे संकेत मिळत असल्याचे उद्गार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी वेळी काढले.
कोरोनासाठी लॉकडाऊन करणे हा योग्य पर्याय नव्हे. जर अर्थव्यवस्था सुरळीत चालू ठेवायची असेल तर उद्योग धंदे व इतर व्यवसाय चालू राहिले पाहिजे. अर्थ व्यवस्था कायम ठेवण्यासाठी आम्हाला कोरोनाच्या मार्गदर्शन तत्वाचे पालन करावेच लागणार आहे.
ओराचा हा गोव्यातील सर्वांत मोठा शो-रूम आहे. या ठिकाणी हिऱयाचे तसेच 22 कॅरेट हॉलमार्क्ड सोन्याचे दानिने उपलब्ध करण्यात आलेले आहे. खास करून नव वधुसाठी लागणारे सर्व दागिने या ठिकाणी उलपब्ध करण्यात आलेले आहे. शो-रूम 3 लेवलचा आहे. दुसऱया लेवलवर खास नव वधुसाठी लागणाऱया दागिन्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. 15 हजारांपासून 5 ते 6 लाख रूपये किंमतीचे दागिने या शो-रूम मध्ये उपलब्ध करण्यात आलेले आहे.
गोव्यात होतोय चांगला व्यवसाय
गोव्यात ओरा ज्वेलर्सला आज पर्यंत लोकांनी चांगला प्रतिसाद दिलाय. हा प्रतिसाद यापुढे असाच कायम राहिल, त्याच बरोबर ओरा ज्वेलर्स आत्ता वास्को, फोंडा तसेच म्हापसा या शहरांनी देखील आपले शो-रूम सुरू करणार असल्याची माहिती यावेळी सेसिल दे सांता मारिया यांनी दिली. गेल्या वर्षी जून महिन्यात म्हणजेच कोरोना महामारीच्या काळात ओरा ज्वेलर्सने देशात आठ ठिकाणी आपली आस्थापने सुरू केली. त्याच बरोबर सात आस्थापनाची फेररचना तसेच नव्या जागेत स्थलांतरीत झाली. हे सगळे केवळ आमच्या विश्वासू ग्राहकांमुळेच शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले.