मुंबई
ओरियंट ग्रीन पॉवर या ऊर्जा क्षेत्रातील कंपनीने डिसेंबर 2021 ला संपलेल्या तिमाहीत 6.28 कोटी रुपये निव्वळ नफा प्राप्त केला आहे. यापूर्वीच्या म्हणजे मागच्या वर्षी समान अवधीत कंपनीने 21.42 कोटी रुपयांचा तोटा सहन केला होता. ऑक्टोबर ते डिसेंबर 2021 या काळात कंपनीने 82.54 कोटी रुपये इतका महसूल प्राप्त केला आहे. जो मागच्या वर्षी समान अवधीत 53 कोटी रुपये इतका होता.