नवी दिल्ली
ओला कंपनीने भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या महत्त्वाच्या पंपांवर हायपर चार्जर सुविधा लवकरच सुरू करण्याचा विचार चालवला आहे. ही सुविधा पंपांसह रहिवासी इमारतीमध्येही उपलब्ध होणार आहे. पुढील वर्षभरात एकूण अशी 4 हजार केंद्रे स्थापित केली जाणार आहेत, असे समजते. हायपरचार्जर सुविधा केंदे ही पुढील 6 ते 8 आठवडय़ात कार्यरत होतील, असेही सांगितले जात आहे.