लवकरच डिलिव्हरी मिळण्याचे संकेत : चीपच्या संकटामुळे विलंब
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ओलाने आपल्या ओला एस1 आणि ओला एस1 प्रो स्कूटरची डिलिव्हरी 15 डिसेंबरपासून सुरु केली असून विविध स्कूटरचा यात समावेश राहणार असून दोन महिन्याच्या प्रतिक्षेनंतर ही उत्सुकता समाप्त झाल्याची माहिती आहे. साधारणपणे कंपनीने चिपच्या तुटवडय़ामुळे अशी स्थिती निर्माण होत असल्याचेही म्हटले होते.
कॅब अग्रीगेटर कंपनी ओलाने आपल्या इलेक्ट्रिक स्कूटर एस 1 आणि एस 1 प्रोची डिलिव्हरी मागील वर्षातील 15 डिसेंबरच्या दरम्यान सुरु केली होती. यानंतर मात्र मोठय़ा प्रमाणात वाढत गेलेल्या ओलाच्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या मागणीमुळे देशामधील विविध भागातून लोकांची पसंती अधिकची वाढत गेल्याचे दिसून आले आहे. यामुळेच ग्राहकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.
नव्या ग्राहकांनाही संधी ः युवकांची पसंती
ओला दररोज हजारोच्या जवळपास इलेक्ट्रिक स्कूटरची निर्मिती करत आहे. यामध्ये देशातील युवकांची अधिकची पसंती ओलाच्या इलेक्ट्रिक स्कूटरना मिळत आहे. ती पाहता उत्पादनावर भर देत असल्याचे कंपनीचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी ट्विटच्या आधारे स्पष्ट केले आहे.
ओला एस प्रो 181 किमी रेंज देत आहे. एस1 प्रो हायपर मोडमध्ये 3 सेकंदात 0-40 किमी तासाला धावणार असल्याची माहिती आहे. ओला एस1 साठी कंपनीने दावा केला आहे, की याची एआरएआय प्रमाणित रेंज 121 किमी आणि 90 किमी प्रतितास इतकी राहणार असून या गाडीला पसंती मिळते आहे.
अगोदर माहिती दिल्याप्रमाणे सदरची स्कूटरही दहा रंगात उपब्लध होणार असून यामध्ये ब्लॅक, पिंक, येलो, ब्लूव्हाईटसह अन्य रंगातही उपलब्ध होणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे.