प्रति सेकंदामध्ये चार स्कूटर्सची विक्री होत असल्याचा सीईओंचा दावा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पाच जुलै रोजी बुकिंग सुविधेसोबत इलेक्ट्रॉनिक स्कूटरची दमदार एन्ट्री झाली होती. यासोबतच मागील चोवीस तासांमध्ये एक लाखापेक्षा अधिक स्कूटर्सचे बुकिंग करण्यात आले आहे. सप्टेंबरमध्ये यांची विक्री सुरु झाली असून सदरच्या स्कूटरची डिलिव्हरी ऑक्टोबरमध्ये होणार आहे.
कंपनीचे संस्थापक भाविश अग्रवाल यांचा दावा आहे, की कंपनी प्रति सेकंदामध्ये चार इलेक्ट्रिक स्कूटर्सची विक्री करत आहे. कंपनीने यामध्ये 600 कोटी पेक्षा अधिकची कमाई केली आहे. शुक्रवारी स्कूटर विक्रीचा शेवटचा दिवस राहणार असून रात्रीपासून स्कूटरची खरेदी बंद होणार आहे.
ओला इलेक्ट्रिक स्कूटर दोन मॉडेलमध्ये असून एस1 आणि एस1 प्रो मध्ये ही स्कूटर उपलब्ध होणार आहे. सदरच्या स्कूटरचे बुकिंग 499 रुपयांमध्ये करण्याची सुविधा आहे. ओला इलेक्ट्रिक स्कूटरच्या एन्ट्रीदरम्यान एस 1 मॉडेलची किमत 99,999 रुपये आणि एस1 प्रो मॉडेलची किमत ही 1,29,999 रुपयांपर्यंत राहणार असल्याची माहिती आहे.
फक्त ऑनलाईन खरेदी करता येणार
ओला इलेक्ट्रिक स्कूटरला ग्राहकांना फक्त कंपनीच्या ऑनलाईन कार्यालयीन वेबसाईटवर किंवा मोबाईल ऍपवर खरेदी करण्याची सुविधा प्राप्त होणार आहे.