खरेदी अगोदर गाडी चालविता येणार- विविध स्टंटचे व्हिडीओ सादर
नवी दिल्ली
ओला इलेक्ट्रिक स्कूटरच्या चाचणीस बुधवारी प्रारंभ झाला आहे. यामध्ये ग्राहक सदरच्या ई-स्कूटरची खरेदी करण्याअगोदर त्यावरून प्रवास करु शकणार आहेत. सध्या ही सुविधा दिल्ली, कोलकाता, अहमदाबाद आणि बेंगळूर आदी ठिकाणी सुरु आहे. कंपनीने सदरची स्कूटर ही 15 ऑगस्ट रोजी सादर केली होती. यात एस1 आणि एस 1 प्रो अशी दोन मॉडेल सादर केल्या आहेत. कंपनीने सदरच्या ड्रायव्हींग चाचणीत गाडीची मजबूती आणि त्याची शक्ती दाखविणारे स्टंटचे व्हिडीओ शेअर केले आहेत.
ओलाचे एसईओ भावेश अग्रवाल यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ सादर केले असून यामध्ये काही स्टंट करणाऱयांनी ओला एस1 च्या मदतीने जप, व्हीली, डोनट यासारख्या कसरती केल्या असल्याचे पहावयास मिळाले आहे. या सर्व घडामोडीतून ओलाची स्कूटर किती मजबूत आहे ते दाखविण्याचा प्रयत्न कंपनीने केला आहे.
ओला ई-इलेक्ट्रिक एस1 मॉडेलची किमत 99,999 रुपये आणि एस1 प्रोची किमत 1,29,999 रुपये असून दिल्ली, गुजरात, महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये सबसिडीसह गाडय़ांच्या वेगवेगळय़ा किमती असल्याची माहिती आहे.
फिचर्स…
3 संकेदात 0 ते 40 किमी स्पीड राहणार असून यात ओलाची एस1 स्कूटर ही 8.5 किलोवॅट पीक पॉवर जनरेट करणारी मोटार असून त्यावर ती धावणार आहे.
यासोबतच कंपनी 750 वॉटचा पोर्टेबल चार्जर देणार असून या मदतीने बॅटरी 6 तासात पूर्ण चार्ज होणार आहे.
गाडीला रिव्हर्सचा पर्याय मिळणार आहे. त्या मदतीने गाडीला पार्किंग करता येणार आहे.
स्कूटरमध्ये 7 इंचाचा टचस्क्रीन डिस्प्ले मिळणार असून तो मूव्ह ऑपरेटिंगवर वापरता येणार आहे.