स्थानिक स्तरावर इ-स्कुटर निर्मितीवर भर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कार भाडे तत्वावर देणाऱया ओला कंपनीने आता इलेक्ट्रीक दुचाकी निर्मितीचा ध्यास घेतला असून येणाऱया काळात या गाडय़ांच्या विक्रीकरता कंपनी अधिक जोर लावणार आहे. मागणीचा कल पाहून ओला कंपनी आपली रणनीती आखणार आहे. कंपनीच्या सूत्रानुसार वर्षाला 20 लाख स्कूटर्स निर्मिती करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. सुरुवातीला पहिल्या टप्प्यात कंपनी नेदरलँडमधून उत्पादित केलेल्या गाडय़ा बाजारात दाखल करणार आहे. पण नंतरच्या कालावधीत या गाडय़ा भारतातील कारखान्यात स्थानिक पातळीवर तयार केल्या जाणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. अशाने स्थानिक मागणी चांगल्या पद्धतीने हाताळणे शक्य होणार आहे. आत्मनिर्भर भारतअंतर्गत कंपनीने आपली पुढची कार्यप्रणाली आखली आहे.
उच्च ऊर्जा घनतेची बॅटरी
आपल्या इलेक्ट्रीक स्कूटरमध्ये उच्च ऊर्जा घनतेची बॅटरी बसवण्याचा कंपनीचा इरादा असून या बॅटरीवर गाडी 240 किलोमीटरचे अंतर कापू शकणार असल्याचे समजते. कंपनीने म्हटले आहे. यावर सध्या अभ्यास सुरू आहे.