प्रतिनिधी / बेळगाव
सरत्या वर्षाला निरोप देऊन नव्या वर्षाच्या स्वागतासाठी बालचमू तयारीला लागले आहेत. नव्यावर्षाचे स्वागत करण्यास कोरोनाची अडचण आहे. तरीदेखील सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी शहरात ओल्डमॅनची प्रतिकृती साकारण्यास वेग आला आहे.
कोरोनामुळे शाळा नसल्याने बालचमू घरी बसून आहेत. पण 2020 हे वर्ष पूर्णपणे अडचणीत गेले आहे. विषाणूच्या प्रसारामुळे कोरोना नियमांचे पालन करून सण साजरे करावे लागले. पण दहशतीच्या वातावरणात आणि तोंडावर मास्क लावून घालविलेल्या वर्षाला निरोप देण्यासाठी बालचमूंनी विविध स्वरुपातील ओल्डमॅनच्या प्रतिकृती साकारण्यास शहरात प्रारंभ केला आहे.