कोकण रेल्वेची सर्व वाहतूक विस्कळीत : अनेक गाडय़ा अन्य मार्गाने वळविल्या,काही गाडय़ा थांबवून परत पाठविल्या
प्रतिनिधी /मडगाव
गोव्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसाचा फटका कोकण रेल्वेला बसला असून थिवी व करमळी स्थानकादरम्यान असलेल्या ओल्ड गोवा बोगद्यात सोमवारी पहाटे 4.40 वाजण्याच्या दरम्यान पाणी व चिखल रेल्वे रूळावर पडल्याने कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. कोकण रेल्वेच्या कर्मचाऱयांनी दुरूस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे. पावसाने विश्रांती घेतली तर रात्री उशिरापर्यंत दुरूस्तीचे काम पूर्ण करणे शक्य होईल, अशी माहिती कोकण रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी बबन घाटगे यांनी दिली.
ओल्ड गोवा बोगदय़ात पाणी व माती एकाच बरोबर पडून चिखल झाल्याचे बोगदय़ाच्या वॉचमनच्या निदर्शनास आले. त्यांनी त्वरित आपल्या वरिष्ठांना कल्पना दिली. त्यानंतर या मार्गावरून धावणाऱया सर्व रेलगाडय़ा मडगाव, करमळी, थिवी, पेडणे स्थानकावर रोखण्यात आल्या.
बोगदय़ाच्या वरच्या बाजूतून गळतोय चिखल
बोगदय़ातील रूळावर साचलेला चिखल हटविण्याचे काम युद्धपातळीवर कोकण रेल्वेच्या कामगारांनी हाती घेतले होते. तसेच बोगदय़ाच्या वरच्या बाजूतून चिखल (माती व पाणी) खाली पडत होता, त्याचे ‘टॅपिंग’ करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र, सातत्याने पाऊस पडत असल्याने या कामात प्रचंड अडथळे येत होते. जर पावसाने विश्रांती घेतली तर रात्री उशिरापर्यंत दुरूस्ती काम पूर्ण होईल, असे घाटगे म्हणाले.
अनेक गाडय़ा वळविल्या, काही परत पाठविल्या
कोकण रेल्वे मार्गावरील खालील गाडय़ा वळविण्यात आल्या आहेत तर काही रेलगाडय़ा थांबविण्यात आलेल्या स्थानकावरूनच सोडल्या जाणार आहेत. पाच गाडय़ा वळविण्यात आल्या आहेत, तर तीन गाडय़ा थांबविलेल्या स्थानकावरुनच परत पाठविण्यात येत आहेत.
वळविण्यात आलेल्या पाच गाडय़ा
1. टेन क्रमांक 02618एच. निजामुद्दीन-एर्नाकुलम डेली स्पेशल दि. 18/7/2021 ही पनवेल, कर्जत, पुणे जंक्शन, मिरज जंक्शन, हुबळी, कृष्णराजपुरम, इरोड जंक्शन शोरानूर जंक्शन मार्गे वळविण्यात आली आहे.
2. टेन क्रमांक 04696 अमृतसर जंक्शन – कोचुवेली साप्ताहिक विशेष दि. 18/07/2021 रोजी पनवेल, कर्जत, पुणे जंक्शन, मिरज जंक्शन, हुबळी, कृष्णराजपुरम, इरोड जंक्शन, शोरानूर जंक्शन मार्गे वळविण्यात आली आहे.
3. टेन क्रमांक 01224 एर्नाकुलम जंक्शन – लोकमान्य टिळक (टी) डय़ुरांटो द्वि-साप्ताहिक विशेष दिनांक 18/07/2021 मडगाव जंक्शन, लोंडा जंक्शन, मिरज जंक्शन, पुणे जंक्शन, कर्जत, पनवेल मार्गे वळविण्यात आली आहे.
4. टेन क्र. 09261 कोचुवेली-पोरबंदर साप्ताहिक विशेष दि. 18/07/2021 रोजी मडगाव जंक्शन, लोंडा जंक्शन, मिरज जंक्शन, पुणे जंक्शन, कर्जत, पनवेलमार्गे वळविण्यात आली आहे.
5. टेन क्रमांक 02977 एर्नाकुलम जंक्शन-अजमेर जंक्शन 18/07/2021 रोजी साप्ताहिक विशेष मडगाव जंक्शन, लोंडा जंक्शन, मिरज जंक्शन, पुणे जंक्शन, कर्जत, पनवेलमार्गे वळविण्यात आली आहे.
थांबवल्या तेथूनच परत निघणाऱया गाडय़ा
1. प्रवासी रेलगाडी क्रमांक 01111 मुंबई सीएसएमटी-मडगाव जंक्शनचे प्रवासी ‘कोकणकन्या’ दैनिक विशेष दि. 18/07/2021 रोजी थिवीहून मडगाव जंक्शन येथे बदली करण्यात आले.
2. प्रवासी रेलगाडी क्रमांक 01114 मडगाव जंक्शन-मुंबई सीएसएमटी ‘मांडवी’ दैनिक स्पेशल दिनांक 19/7/2021 रोजी रोजी धावणारी गाडी थिवी स्थानकावरून सुटणार आहे. या रेलगाडीचे मडगावातून निघणाऱया प्रवाशांना मडगावातून थिवी स्थानकावर नेण्यात आले.
3. टेन क्रमांक 02432 एच. निजामुद्दीन-तिरुअनंतपुरम मध्यवर्ती ‘राजधानी’ त्रिकोणी साप्ताहिक विशेष दि. 18/0/07/2012 रोजी पेडणेहून प्रवाशांना मडगाव जंक्शन येथे आणण्यात येतील.
4. रेल्वे क्र. 02413 मडगाव जंक्शन – एच. निजामुद्दीन ‘राजधानी’ द्वि-साप्ताहिक विशेष दि. 19/7/2021 रोजी प्रवाशांना मडगाव जंक्शन येथून पेडणे येथे नेण्यात येतील. प्रवाशांना नेण्यासाठी कोकण रेल्वेने बस सेवा उपलब्ध केली होती.