आपल्या पायाची नखे कापण्यापूर्वी जरा काळजीपूर्वक तपासा. नखे तपासण्यासाठी जाणारे साठ सेकंद कदाचित तुमचे आयुष्य वाचवू शकतील.
- या क्षेत्रातील तज्ञ डॉक्टरांच्या मते पायांच्या नखांची वेळोवेळी तपासणी केल्यास कातडीचा कर्करोग (स्किन कॅन्सर) झालेला असल्यास पटकन कळू शकतो आणि त्याच्यावर उपचारही करता येतील.
- पायाचा मेलोनोमा झालेल्या व्यक्तींपैकी निम्म्या पाच वर्षात या रोगाने मरण पावतात. कारण अनेकांना आपल्याला अशा प्रकारचा कॅन्सर झाला आहे, हे कळेपर्यंत तो शरीरभर पसरलेला असतो. त्यामुळे तो उपचारांपलीकडे गेलेला असतो.
- दरवर्षी जगात मेलोनोमा रूग्ण स्कीन कॅन्सरने मरतात. पण मेलोनोमा झाल्याचे लवकर समजल्यास रूग्ण वाचण्याची शक्यत असते.
- इतर कॅन्सरप्रमाणे मेलोनोमा प्रकारचा कॅन्सर कोणत्याही वयोगटाला होऊ शकतो. अगदी तरूण पिढीही त्यातून सुटू शकत नाही. त्यातही श्वेतवर्णियांना कृष्णवर्णीयांपेक्षा दहा टक्क्यांनी हा रोग होण्याची दाट शक्यता असते.
- पण अभ्यासात असे आढळले आहे, की निम्म्याहून अधिक कृष्णवर्णीय व्यक्ती मेलोनोमाची लक्षणे उशिरा लक्षात आल्याने मरण पावल्या. ङवेळोवेळी पायांकडे जरा निरखून पाहिल्यास त्यावर एखादा डाग, तीळ असे काही संशयास्पद आढळल्यास तातडीने डॉक्टरांकडे जा.