वृत्तसंस्था/ माद्रीद
डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या माद्रीद खुल्या महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत जपानच्या नाओमी ओसाकाचे एकेरीतील आव्हान दुसऱया फेरीत मुचोव्हाने संपुष्टात आणले.
जपानच्या ओसाकाने अलिकडेच अमेरिकन आणि ऑस्ट्रेलियन ग्रण्ड स्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. माद्रीद स्पर्धेतील पहिल्या फेरीत ओसाकाने आपल्याच देशाच्या डोईचा पराभव करून दुसरी फेरी गाठली होती. रविवारी झालेल्या दुसऱया फेरीतील सामन्यात कॅरोलिना मुचोव्हाने ओसाकाचा 6-4, 3-6, 6-1 असा पराभव करत तिसऱया फेरीत प्रवेश मिळविला. झेकच्या मुचोव्हाचा पुढील फेरीतील सामना ग्रीकच्या सॅकेरी आणि इस्टोनियाच्या कोंटावेट यांच्यातील विजयी खेळाडू बरोबर होणार आहे.