वृत्तसंस्था/ कॅलिफोर्निया
डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या इंडियन वेल्स खुल्या महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत जपानची नाओमी ओसाका तसेच युक्रेनची मार्ट कोस्टयुक व बेलारुसची सॅसनोव्हिच यांनी एकेरीची दुसरी फेरी गाठली.
शुक्रवारी या स्पर्धेतील झालेल्या पहिल्या फेरीतील सामन्यात ओसाकाने अमेरिकेच्या स्लोअन स्टिफेन्सचा 3-6, 6-1, 6-2 असा पराभव करत विजयी सलामी दिली. स्टिफेन्सने 2017 साली अमेरिकन ग्रॅण्डस्लॅम स्पर्धा जिंकली होती. गेल्या जानेवारीत झालेल्या ऑस्ट्रेलियन ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेनंतर ओसाकाचा हा पहिला सामना होता. ओसाकाला विजयासाठी तब्बल दोन तास झगडावे लागले. ओसाका आणि कुडरमेटोव्हा यांच्यात दुसऱया फेरीतील सामना होईल. युपेनच्या मार्टा कोस्टयुकने झॅनेवस्काचा 6-7 (5-7), 7-6 (8-6), 7-5 असा पराभव करत दुसरी फेरी गाठली. बेलारुसच्या सॅसनोव्हिचने दुसऱया फेरीत प्रवेश मिळविताना कोलंबियाच्या ओसोरिवोचा 6-4, 5-0 असा पराभव केला. दुखापतीमुळे ओसोरिवोने दुसरा सेट चालू असताना स्पर्धेतून माघार घेतली. सॅसनोव्हिचचा दुसऱया फेरीतील सामना झेकच्या क्विटोव्हाशी होणार आहे.