वृत्तसंस्था/ सेंट पीटर्सबर्ग (रशिया)
येथे सुरू असलेल्या डब्ल्यूटीए टूरवरील सेंट पीटर्सबर्ग चषक महिलांच्या टेनिस स्पर्धेत सातव्या मानांकित जेलना ओस्टापेंको आणि ऍनेट कोंटाव्हेट यांच्यात उपांत्य फेरीची लढत होणार आहे. त्याचप्रमाणे बेगू आणि सॅकेरी यांच्यात उपांत्य फेरीचा दुसरा सामना होईल.
शुक्रवारी खेळविण्यात आलेल्या महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात लॅटव्हियाच्या ओस्टापेंकोने तब्बल अडीच तासांच्या कालावधीत बेलारूसच्या सेसनोव्हिचचा 7-6 (7-5), 4-6, 6-3, इस्टोनियाच्या कोंटाव्हेटने स्वीसच्या बेलिंडा बेनसिकचा 7-6 (7-5), 6-2 असा पराभव करत उपांत्य फेरीत स्थान मिळविले आहे. दुसऱया एका सामन्यात टॉप सीडेड मारिया सॅकेरीने इलेसी मर्टन्सवर 7-6 (7-5), 6-2 त्याचप्रमाणे इरिना बेगुने मार्टिनकोव्हावर 6-4, 6-2 अशी मात करत शेवटच्या चार खेळाडूंत स्थान मिळविले आहे.