जगात प्रत्येक गोष्ट विकली जाऊ शकते, केवळ गरज बाजाराची असते असे म्हटले जाते. सध्या काही असेच घडू लागले आहे. जे पाणी निसर्गाने सर्वांना मोफत दिले आहे, आता तेच पिण्याचे पाणी काही ठिकाणी इतक्या महागडय़ा दरात विकले जाते, जे ऐकून तुम्हीही चकित व्हाल. असेच एक शहर आहे, ओस्लो जेथे पाण्याच्या एक लिटर बाटलीची किंमत सर्वाधिक आहे.
एका सर्वेक्षणानुसार ओस्लोमधील पाण्याच्या बाटलीची किंमत 120 शहरांच्या सरासरी किमतीपेक्षा तीनपट अधिक आहे. तेल अवीव, न्यूयॉर्क आणि हेलसिंकी हे शहरे देखील ओस्लोनंतर पाण्याची बाटली (अर्धा लिटर) खरेदी करण्यासाठी सर्वात महागडी ठिकाणे आहेत.
किमतीवरून अमेरिकेतील 30 आणि पूर्ण जगातील 120 शहरांमध्ये नळ आणि बाटलीबंद पाण्याच्या खर्चाची तुलना आणि विश्लेषण सर्वेक्षणासाठी करण्यात आले. पण पाण्याची किंमत विचारात घेतल्यास व्हर्जिनियात एक बाटली पाणी 115 रुपये, लॉस एंजिलिसमध्ये 111 रुपये, न्यू ऑरलियन्समध्ये 107 रुपये आणि सॅन जोशमध्ये 90 रुपयांमध्ये मिळले. पण ओस्लोमध्ये एक बाटली पाण्याची किंमत किती हे मात्र सांगण्यात आलेले नाही.
ओस्लोला पाण्याच्या किमतीप्रकरणी पहिल्या स्थानी ठेवण्यात आले आहे. त्यानंतर लॉस एंजिलिस, फीनिक्स, सॅन फ्रान्सिस्को आणि सॅन डिएगो ही जगातील 20 सर्वात महागडी शहरे आहेत. ओस्लोमध्ये पाण्याची किंमत 120 शहरांच्या तुलनेत 212 टक्क्यांनी अधिक आहे. तर बाटलीबंद पाणी 195 टक्के अधिक महाग आहे.