हरमल / वार्ताहर
मधलामाज मांदे येथील ’ओ सायबा’ सुपर मार्केट च्या इमारतीत ’डेझर्ट्स अँड मोर’ ह्या दर्जेदार खाद्यपदार्थ अस्थापनांचे ’ओ सायबा पेस्ट्री’ चे उदघाटन दिवाळीच्या मुहूर्तावर नुकतेच करण्यात आले.
ह्या डेझर्ट्स अँड मोरच्या प्रेंचायझी चे उदघाटन जिनो फार्माचे डॉ सागर साळगांवकर व सौ पल्लवी साळगांवकर यांच्याहस्ते करण्यात आले.यावेळी ओ सायबा तथा प्रेंचायझीचे मालक सद्गुरू मुकुंद नाईक ,गोविंद पार्सेकर व त्यांचे कुटुंबीय होते.मांदे गावांत डेझर्ट्स आस्थापनाची गरज होती.ह्या आस्थापनातून केक्स,पेस्ट्री,कुकीस,ब्रेडस आदी ब्रँडेड खाद्यपदार्थ मिळतील,असे प्रेंचायझीचे वितरक सद्गुरू नाईक यांनी सांगितले. यावेळी जिनो फर्मास्युटिकल्सचे सिस्टर कन्सर्स, डेझर्ट्स अँड मोरचे संचालक सागर साळगांवकर यांनी ओ सायबाला शुभेच्छा दिल्या.