प्रतिनिधी / बेळगाव
मुंबई येथे घसरून पडून औदुंबर चंद्रकांत तेंडोलकर या 32 वषीय रुग्णाला फेसबुक प्रेंड्स सर्कलच्या पुढाकाराने मदत मिळाली. त्यामुळे त्याच्यावर उपचार सुरू झाले. मात्र अद्यापही त्याला आर्थिक मदतीची गरज आहे. औदुंबर हे मुंबई येथे दि. 1 ऑगस्ट 2019 रोजी घसरून पडले. त्यानंतर मुंबई येथे त्यांना इस्पितळात दाखल केले. 12 सप्टेंबर रोजी त्यांना बेळगावच्या वेणुग्राम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचाराचा खर्च अधिक असल्याने त्यांच्या आईने राहते घर विकले. या शिवाय फेसबुक प्रेंड्स सर्कलने बराच निधी जमा करून उपचाराचा खर्च भागविला. मात्र अद्यापही औदुंबरला आर्थिक मदतीची गरज असून इच्छुकांनी औदुंबर तेंडोलकर स्टेट बँक ऑफ इंडिया, खाते क्र. 30274505835, आयएफएससी कोड एसबीआयएन0002217, उद्यमबाग या खात्यावर मदत पाठवावी, असे आवाहन फेसबुक प्रेंड्न्स सर्कलचे संतोष दरेकर यांनी केले आहे.