प्रतिनिधी / सांगली
औदुंबर (जिल्हा सांगली) येथे १९३९ पासून औदुंबर ग्रामीण साहित्य संमेलन भरत आले आहे. हे संमेलन दरवर्षी मकर संक्रांतीला भरते. ही मोठी परंपरा व सातत्य असलेल्या सदानंद साहित्य मंडळाच्या औदुंबर साहित्य संमेलनाचे यंदा ७८ वे वर्ष आहे व यंदा पारावरच्या मकरसंक्रांत संमेलनाचे अध्यक्षपद प्रा. वैजनाथ महाजन भूषवणार आहेत. महाजन, वक्ते, ललित लेखक, भाष्यकार आणि वाडःमयीन चळवळीतील अग्रदूत म्हणून सर्वदूर परिचित आहेत.