नवी दिल्ली : देशाच्या औद्योगिक उत्पादन वृद्धीचा वेग हा सलग तिसऱया महिन्यात सुस्त राहिला आहे. यामध्ये नोव्हेंबर 2021 मध्ये फक्त 1.4 टक्क्यांच्या वृद्धीची नोंद करण्यात आली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे नकारात्मक वातावरणाचा प्रभाव कमी होत आहे.
औद्योगिक उत्पादन निर्देशांकामध्ये 77.63 टक्के हिस्सेदारी ठेवणाऱया पुनर्निर्माण क्षेत्रामध्ये नोव्हेंबरमध्ये 0.9 टक्के वृद्धी झाली. तर नोव्हेंबर 2020 मध्ये यामध्ये 1.6 टक्के घसरण राहिल्याची माहिती राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (एनएसओ) यांनी दिली आहे.
औद्योगिक उत्पादन चालू आर्थिक वर्षात मे ते ऑगस्टच्या दरम्यान यामध्ये चांगली वाढ राहिली आहे. त्यानंतर मुख्य रुपाने नकारात्मक स्थितीचा प्रभाव राहिल्याने सप्टेंबरमध्ये औद्योगिक उत्पादन घटून 3.3 टक्के आणि ऑक्टोबरमध्ये 4 टक्क्यांवर राहिले आहे.
अन्य नोंदी…
- नोव्हेंबर 2021 मध्ये आयआयपी 128.5 अंकांवर
- नोव्हेंबर 2020 मध्ये औद्योगिक उत्पादन 1.6 टक्क्यांनी घटले
- चालू आर्थिक वर्षातील एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यान 17.4 टक्क्यांनी उत्पादन वाढले.
- जानेवारी 2021 मध्ये आयआयपीमध्ये 0.6 टक्के आणि फेब्रुवारीत 3.2 टक्क्यांची घसरण