वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशातील औद्योगिक उत्पादन जून 2021 मध्ये 13.6 टक्क्यांनी वाढले आहे. सदरची कामगिरी ही मागच्या वर्षाच्या तुलनेत पूनर्निर्माण, खाण तसेच वीज क्षेत्रातील सकारात्मक प्रतिसादामुळे प्राप्त करण्यात यश मिळाले आहे.
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (एनएसओ) यांच्याकडून सादर करण्यात आलेल्या औद्योगिक उत्पादन निर्देशांकानुसार पूनर्निर्माण क्षेत्रामध्ये उत्पादन जून 2021 मध्ये 13 टक्क्यांनी वाढून आयआयपीमध्ये पुनर्निर्माण क्षेत्राची हिस्सेदारी 77.6 टक्के राहिली आहे. खाण उत्पादनामध्ये 23.1 टक्के आणि वीज उत्पादनात 8.3 टक्क्यांची वृद्धी झाली. एनएसओच्या आकडेवारीनुसार आयआयपी 122.6 अंकांवर तर जून 2019 मध्ये निर्देशांक 129 अंकांवर होता. -उपलब्ध आकडेवारीनुसार औद्योगिक उत्पादनात सुधारणा -कोरोना संकट व लॉकडाऊनचा प्रभाव राहिला