प्रतिनिधी / बेळगाव
कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असल्याने बेळगाव जिल्हा प्रशासनाने विकेंड लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवार दि. 22 रोजी सकाळी 6 वाजल्यापासून सोमवार दि. 24 रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत कडक लॉकडाऊन केले जाणार आहे. यामुळे औद्योगिक वसाहतींमधील सर्व कारखाने बंद ठेवले जाणार आहेत.
दोन दिवसांपूर्वीच अत्यावश्यक सेवा व साहित्य निर्मिती करणाऱया कारखान्यांना परवानगी दिली होती. परंतु विकेंड लॉकडॉऊनला कडक अंमलबजावणी केली जाणार असल्याने अत्यावश्यक सेवा व साहित्य निर्मिती करणारे कारखानेही बंद केले जाणार आहेत. बेळगावचे जिल्हाधिकारी व जिल्हा औद्योगिक अधिकाऱयांच्या सूचनेनुसार कारखाने बंद ठेवले जाणार आहेत. याची माहिती लघु उद्योजक संघटनेच्यावतीने सर्व कारखान्यांना देण्यात आली आहे.