ऑनलाइन टीम / औरंगाबाद :
संपूर्ण देशात कोरोना व्हायरस धुमाकूळ घालत आहे. त्यातच औरंगाबादमधुन चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. औरंगाबाद शहरात गुरुवारी पुन्हा कोरोनाचे 35 पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेत. त्यामुळे औरंगाबादेत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1397 वर पोहोचली आहे.
आज दिवसाच्या सुरुवातीलाच 35 रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर आत्तापर्यंत 65 जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे.
जिल्हा परिषदे कडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी आढळलेल्या 35 रुग्णांमध्ये शहरातील बायाजीपूरा येथे 1, मिसारवाडी 1, वाळूज महानगर 1, संजय नगर 1, शहागंज 1, हुसेन कॉलनी 1, कैलास नगर 1, रोकडिया हनुमान कॉलनी 1, उस्मानपुरा 1, ईटखेडा 1, एन -4 येथील 3, नारालीबाग 2, हमालवाडी 4, रेल्वे स्टेशन परिसर 2, सिटी चौक 1, नाथ नगर 1, बालाजी नगर 1, साईनगर एन 6 येथील 1, संभाजी कॉलनी एन 6 येथील 2, करीम कॉलनी रोशन गेट 1, अंगुरी बाग 1, तानाजी चौक बालाजी नगर 1, एन अकरा हडको 1, जय भवानी नगर 2, अन्य 1 या भागातील हे रुग्ण आहेत. यामध्ये 21 पुरुष आणि 14 महिलांचा समावेश आहे.
दरम्यान, आता पर्यंत 600 पेक्षा अधिक रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.