ऑनलाइन टीम / औरंगाबाद :
संपूर्ण देशात कोरोना व्हायरस धुमाकूळ घालत आहे. त्यातच औरंगाबादमधुन चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात मागील चोवीस तासात कोरोनाचे 132 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे औरंगाबादेत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 2407 वर पोहोचली आहे.
गुरुवारी आढळलेल्या 132 रुग्णांमध्ये शहरातील बायाजीपूरा येथे 1, बेगमपुरा मध्ये1, सुभेदारी विश्रामगृहा जवळ 1, उस्मानपुरा 2, एन आठ मध्ये 1, जुना बाजार 1, एन दोन सिडको 1, आकाशवाणी परिसर 1, उलका नगरीत 1, संजय नगर 1, गणेश कॉलनी 1, बुड्डीलेन 1, बंजारा कॉलनी 1, एन सात सिडको 1, न्यायनगर 2, हेडगेवार रुग्णालय परिसर 1, एम जी एम रुग्णालय परिसर 1, शिवाजी नगर 5, उत्तम नगर 3, कैलास नगर 7, गादीया विहार 1, सहकार नगर 1, नक्षत्र वाडी 1, चेलापुरा 1, पोलिस कॉलनी 1, संजय नगर – बजियापुरा 1, हुसेन कॉलनी 1, मुकुंदवाडी 1, सातारा परिसर 1, साई नगर एन सहा 2, एन आठ सिडको 1, पांडुरंग कॉलनी, खोडकपुरा 2, हरिप्रसाद अपार्टमेंट 1, दशमेश नगर 1, पद्मपुरा 2, गांधी नगर 3, सिल्क मिल्क कॉलनी 1, विशाल नगर 3, बेगमपुरा 2, गोविंदनगर 1, समतानगर 1, फाजिलपुरा 4, न्यू हनुमान नगर 5, सिडको एन ८ 12, गौतम नगर 2, रशीदपुरा 1, मयूर पार्क म्हसोबा नगर 1, भवानी नगर 1, भारतमाता नगर 3, विजयनगर 1, गजानन नगर 1, कोहिनूर कॉलनी 1, जिल्हा परिषद परिसर 1, हर्सूल सांगवी 1, सिल्व्हर हॉस्पिटल परिसर 3, टि.व्ही सेंटर 1, बिस्मिल्ला कॉलनी 3, सिडको वाळुज महानगर एक 2, एकता नगर 1, बजाज नगर 7, साईनगर पंढरपूर 3, जुनी मुकुंदवाडी 7, नारेगाव 1, गंगापूर 1, नायगाव 1, सिल्लोड 1, उपसंचालक आरोग्य कार्यालय परिसर 1, अन्य 1 या भागातील कोरोना बाधित आहेत. यामध्ये 75 पुरूष आणि 57 महिला रूग्णांचा समावेश आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील एकूण 2407 रुग्णांपैकी आत्तापर्यंत 121 जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. तर 955 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.