ऑनलाइन टीम / औरंगाबाद :
देशात कोरोना व्हायरस धुमाकूळ घालत आहे. त्यातच औरंगाबादमधुन चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. औरंगाबाद शहरात आज पुन्हा दिवसाच्या सुरुवातीलाच कोरोनाचे 17 पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेत. त्यामुळे औरंगाबादेत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 495 वर पोहोचली आहे.
औरंगाबाद मध्ये पहिला रुग्ण 15 मार्च रोजी सापडला होता. एप्रिल महिन्यात ही संख्या 50 च्या आसपास होती. मात्र, गेल्या महिन्यात रुग्णांची संख्या झपाट्याने फैलावत आहे. हा आकडा थेट 500 च्या घरात पोहचला आहे.
एक मे रोजी औरंगाबाद मध्ये 39, 2 मे रोजी 23, 3 मे रोजी 17, 4 मे रोजी 47, 5 मे ला 24, 6 मे रोजी 28, 7 मे रोजी 17 तर 8 मे रोजी 100 पेक्षा जास्त रुग्ण आढळले आहे. अशा प्रकारे मागील आठ दिवसात कोरोनाच्या जवळपास 300 नव्या रुग्णांची भर पडली आहे.
औरंगाबादमध्ये आतापर्यंत 5 पेक्षा अधिक जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 25 पेक्षा अधिक जणांना डिस्चार्ज मिळाला आहे.