ऑनलाइन टीम / औरंगाबाद :
औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयातील एका २८ वर्षीय डॉक्टरांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. डॉ. शशाद्री गौडा एम. डी. मेडिसीन असे आत्महत्या केलेल्या डॉक्टरांचे नाव आहे.
डॉ. शशाद्री गौडा यांनी घाटीतून मेडीकलचे शिक्षण घेतले. तसेच, ते गोल्ड मेडलिस्ट म्हणून पासआउट झाले होते. त्यानंतर ते येथेय सहाय्यक प्राध्यापक म्हणून जून महिन्यांपासून रुजू झाले. विभागातील लाडके आणि हुशार डॉक्टर अशी डॉ. गौडा यांची ओळख होती. त्यांच्या अशा जाण्याने घाटीत हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, मनोविकार जडल्याच्या संशयातून त्यांनी आत्महत्या केली असा प्राथमिक अंदाज व्यक्त होतो आहे. गौडा यांची सुसाइड नोट पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. मात्र या सुसाइड नोटमध्ये काय लिहिलं आहे ते स्पष्ट केलेलं नाही. पोलिसांनी त्यांच्या मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवून पुढील तपास सुरू केला आहे.