ऑनलाइन टीम / औरंगाबाद :
औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचे 92 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे औरंगाबादेत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 2918 वर पोहोचली आहे. यापैकी 1549 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती मंगळवारी प्रशासनाकडून देण्यात आली.
आढळलेल्या रुग्णांमध्ये मुकुंदवाडी 1, कैसर कॉलनी 1, बेगमपुरा 2, चेलीपुरा 1, उस्मानपुरा 1, रेहमानिया कॉलनी 1, ईटखेडा 2, चिखलठाणा 4, वैजापुर 1, गारखेडा परिसर 4, खोकडपुरा 1, न्यु विशाल नगर 1, बायजीपुरा 1, आंबेडकर नगर 2, बंजारा कॉलनी 2, एस.टी. कॉलनी 1, एन-9 सिडको 3, पुंडलिक नगर 3, छत्रपती नगर 2, जिन्सी राजा बाजार 2, शहानुरवाडी 11, जवाहर कॉलनी 11, जालान नगर1, वडजे रेसिडेन्सी 1, सिल्क मिल कॉलनी 1, शिवाजीनगर 2, रोजा बाग दिल्ली गेट 2, बन्सीलाल नगर 1, बालाजी नगर 1, भाग्यनगर 3, कोहिनुर कॉलनी 1,एन-11 सिडको 3, जयभवानी नगर 1, गादीया विहार 2, दिवानदेवडी 1, सिडको 1, वाहेगाव 1, एन-11, टिव्ही सेंटर 1, शांतीपुरा, छावणी 1, रहिम नगर 1, प्रकाश नगर 1, बुध्द नगर 1, हडको, टिव्ही सेंटर 1, सुधाकर नगर 1, न्यु हनुमान नगर 1, दुधड 1, कानडगांव, ता. कन्नड 1, देवगांव रंगारी लक्ष्मीनगर 1 आणि वाळुज मधील एकाचा समावेश आहे. यामध्ये 54 पुरूष आणि 39 महिला रुग्णांचा समावेश आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील एकूण 2918 रुग्णांपैकी आत्तापर्यंत 158 जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. तर 1209 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे ही प्रशासनाकडून यावेळी सांगण्यात आले.