अभिनेत्री कंगना रनौतने स्वतःच्या ‘तेजस’ चित्रपटाचे चित्रिकरण सुरू केले आहे. कंगनाने बुधवारी समाजमाध्यमांवर भावुक पोस्ट प्रसारित करत ‘तेजस’चे लेखक-दिग्दर्शक सर्वेश मेवाडा यांच्या स्ट्रगलसंबंधी माहिती दिली आहे. कंगनाने स्वतःच्या पोस्टमध्ये दिग्दर्शकाच्या कुटुंबासोबतचे छायाचित्रही प्रसारित केले आहे. सर्वेश मेवाडा ‘तेजस’द्वारे दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पदार्पण करणार आहेत.
मेवाडा यांना स्वतःचा पहिला बेक मिळविण्यासाठी एक दशकापेक्षाही अधिक काळापर्यंत स्ट्रगल करावा लागला आहे. आउटसायडर्ससाठी (पार्श्वभूमी नसलेले) बॉलिवूडमध्ये काहीही मोठे करणे सोपे नसते असे कंगनाने म्हटले आहे.
थलाइवी पुढील महिन्यात
चित्रपटात कंगना वायुदलातील शिख अधिकारी तेजस गिल यांची व्यक्तिरेखा साकारताना दिसून येणार आहे. तेजसह कंगना तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांचा जीवनपट ‘थलाइवी’मध्येही दिसून येईल. ए.ए.ल विजय यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला हा चित्रपट 23 एप्रिल रोजी चित्रपटगृहांमध्ये झळकणार आहे. याचबरोबर कंगना ‘धाकड’, ‘मणिकर्णिका रिटर्न्स ः द लिजेंड ऑफ दिद्दा’मध्येही दिसून येईल.