- 10 नोव्हेंबरला चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश
ऑनलाईन टीम / मुंबई :
अभिनेत्री कंगना रानौत आणि तिची बहीण रंगोली रानौतला मुंबई पोलिसांनी मंगळवारी पुन्हा एकदा नोटीस बजावली आहे. कंगना आणि तिच्या बहिणीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्य कंगनाने केली होती. त्यानंतर कोर्टाने पोलिसांना कंगना वर गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आज पुन्हा एकदा गुन्हा नोंदविला असून चौकशीसाठी बोलावले आहे. 156 (अ) अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, कंगनाच्या घरी लग्न असल्याने कंगनाने 15 नोव्हेंबर नंतर चौकशीसाठी येण्याची मुदत वाढवून घेतली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा मुंबई पोलिसांकडून 10 नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी बोलावले आहे.
कंगनाने केलेले ट्विट, शेअर केलेले व्हिडिओ तसेच वांद्रे मेट्रोपॉलीटन मॅजिस्ट्रेट समोर आलेल्या तक्रारी नंतर तपास करण्यात आला आणि या सर्वांबद्दल कंगनाकडून उत्तरे पाहिजे असल्याने कंगनाला समन्स बजावण्यात आले आहे. या प्रकरणी एफआयआरमध्ये कंगनाची बहिण रंगोलीचेही नाव असल्याने तिलाही चौकशीसाठी बोलविण्यात आले आहे.