ग्रा. पं. सदस्याचा पुढाकार : बँक, ग्रा.पं.-नागरिकांना वितरण
प्रतिनिधी /बेळगाव
कणेरी मठातून आयुर्वेदिक औषधे (रोग प्रतिकारशक्ती वाढविणारे) आणून सुमारे 3 हजार नागरिकांना वाटण्यात आली. कंग्राळी बी. के. येथील ग्राम पंचायत सदस्य प्रदीप पाटील यांच्या पुढाकारातून ही औषधे वाटण्यात आली. कंग्राळी बी. के. येथेही कोरोनाचा फैलाव वाढत असल्यामुळे दक्षता म्हणून हा उपक्रम राबविण्यात आला.
सदस्य प्रदीप पाटील यांनी ग्राम पंचायतमधील कर्मचारी, आशा कार्यकर्त्या, कॅनरा बँक व ग्रामस्थांना या औषधाचे वितरण केले आहे. या कार्यात त्यांना अनेकांनी सहकार्य केले. कोरोना थोपविण्यासाठी सुरक्षित अंतर, सॅनिटायझर व मास्क वापरण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. कोरोना थोपविण्यासाठी सर्वांचे सहकार्य आणि नियमांचे काटेकोरपणे पालन केल्यास हे शक्मय होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी ग्राम पंचायत अध्यक्षा संध्या चौगुले, पीडीओ मुत्तू बरगी, मनोहर कडोलकर, दादासाहेब धोंडारे, शन्मुख लोहार, शंकर गोरले, यल्लाप्पा पाटील, यल्लाप्पा राजाराम पाटील, गजानन धामणेकर, सोमनाथ हुद्दार, गोपी पाटील, साई अष्टेकर, कुलदीप पाटील यांच्यासह सहकारी उपस्थित होते.