वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
कंग्राळी खुर्द येथील रामनगरमध्ये गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर शनिवारी एकता जनसेवा संघाच्या नामफलकाचे उद्घाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष तुकाराम कांबळे होते. व्यासपीठावर उपाध्यक्षा शिल्पा पाटील, सेपेटरी विशाल पाटील, उपसेपेटरी प्रभावती पाटील, खजिनदार बाळू शिंदे उपस्थित होते.
बाळू कंग्राळकर यांनी उपस्थितांचे स्वागत करून संघ स्थापन करण्याचा उद्देश सांगितला. यावेळी शिक्षणप्रेमी शिवाजी हुरुडे, मुरलीधर कांबळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. हणमंत पाटील, शिवाजी जाधव, मल्लाप्पा वर्पे या निवृत्त जवानांच्या हस्ते नामफलकाचे पूजन करून नामफलकाचे उद्घाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानावरून बोलताना तुकाराम कांबळे म्हणाले, या संघाच्या माध्यमातून सामाजिक भान ठेवून कार्य करणे तसेच एखाद्यावर अन्याय झाल्यास त्याला सहकार्य करून त्याच्या पाठीशी उभे राहणे, तसेच इतर सामाजिक कार्ये करणे हाच उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी एकता जनसेवा संघाचे कार्यकर्ते, महिला कार्यकर्त्या व ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन बाळू कंग्राळकर यांनी केले.