नवीन चेहऱयांना संधी देऊन विकास साधण्याचा प्रयत्न
वार्ताहर/ कंग्राळी खुर्द
कंग्राळी खुर्द व अलतगा गावच्या ग्राम पंचायतमधील मतदारांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून देऊन समितीचा बालेकिल्ला अभेद्य राखला आहे. 30 डिसेंबर रोजी झालेल्या मतमोजणीमध्ये बऱयाच प्रभागामध्ये नवीन चेहऱयांना मतदारांनी संधी देऊन गावचा विकास करण्यास निवड केली आहे तर काही माजी सदस्यांनी हॅटट्रिक साधली आहे तर काही जण दुसऱयांदा निवडून आले आहेत. यामध्ये एका माजी ता. पं. सदस्याचा समावेश आहे.
कंग्राळी खुर्द ग्राम पंचायतीमध्ये 14 वॉर्ड आहेत. यामध्ये कंग्राळी खुर्द गावामध्ये 12 वॉर्डमधून 24 ग्रा. पं. सदस्यांची निवड तर अलतगा गावामधून 2 वॉर्डामधून 4 सदस्यांची निवड केली आहे. मात्र वॉर्ड नं. 8 मधून कविता मनोहर शिंदे यांनी जनरल महिलांसाठी अर्ज भरण्यास आला होता. मात्र, तो बाद ठरविण्यात आला असल्याने त्या ठिकाणची निवडणूक रद्द करण्यात आली आहे. ग्राम पंचायतीच्या नवनिर्वाचित सदस्यांमध्ये माजी अध्यक्ष रमेश कल्लाप्पा कांबळे चौथ्यांदा तर ग्रा. पं. अध्यक्ष यल्लाप्पा पाटील तिसऱयांदा, लता पाटील व मीना मानप्पा पाटील माजी अध्यक्षा दुसऱयांदा तर माजी उपाध्यक्ष केंपाण्णा सनदी यांनी दुसऱयांदा विजय संपादन केला आहे. तसेच सदस्यांमध्ये चेतक कांबळे तिसऱयांदा, गुडगेनहट्टी दुसऱयांदा निवड होऊन ग्राम पंचायतीच्या राजकारणात सक्रिय झाल्या आहेत. याशिवाय सागर विजय पाटील यांनी ता. पं. सदस्य म्हणून काम केले आहे तर दुसऱयांदा ग्राम पंचायत सदस्य म्हणून निवडून आले आहेत.
26 ग्राम पंचायतीच्या सदस्यांपैकी 5 जणांची बिनविरोध निवड झाली आहे. ग्राम्घ् पंचायतीच्या निवडीतील विजयी उमेदवार- वॉर्ड नं. 1- परशराम गोपाळ पाटील, मधुमती बाळाराम पाटील, वीणा वीरभद्रय्या पुजारी, वॉर्ड नं. 2- यल्लाप्पा लुमाण्णा पाटील, ज्योती सुधीर पाटील, राधा कृष्णा कांबळे, वॉर्ड नं. 3- कल्लाप्पा नागोजी पाटील, रेखा मष्णू पावशे, वॉर्ड नं. 4- वैजनाथ परशराम बेन्नाळकर, सुनीता सुरेश जाधव (बिनविरोध), वॉर्ड नं. 5- विनायक जयवंत कम्मार (बिनविरोध), भाग्यश्री पुंडलिक गौंडवाडकर, वॉर्ड नं. 6- धनंजय मारुती तुळसकर, मीना मल्लाप्पा मुतगेकर, वॉर्ड नं. 7- सागर विजय पाटील, वॉर्ड नं. 8- महेश वसंत धामणेकर, वॉर्ड नं. 9- कमला हरीश पाटील, वॉर्ड नं. 10- राकेश रमेश धामणेकर, वॉर्ड नं. 11- केंपाण्णा कृष्णा सनदी, वॉर्ड नं. 12- जनाबाई सतीश गुडगेनहट्टी, लता लक्ष्मण पाटील, रमेश कल्लाप्पा कांबळे, वॉर्ड नं. 13- दोड्डव्वा सिद्धाप्पा माळगी (बिनविरोध), चेतक यल्लाप्पा कांबळे, वॉर्ड नं. 14- गिरीजा सुरेश सुतार (बिनविरोध), विनायक परशराम शिंदे.
ढिसाळ नियोजनामुळे कंग्राळी खुर्द सदस्यांचा निकाल यायला बराच उशीर लागला. त्यामुळे नवनिर्वाचित सदस्यांसह समर्थकांमध्ये तीव्र नाराजी पसरलेली होती. मात्र, जसजसे निकाल जाहीर होत होते तसतसे विजयी उमेदवार बाहेर पडल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी गुलाल उधळण करत उमेदवाराच्या जयजयकाराच्या घोषणा दिल्या. विजयी उमेदवारांनी कंग्राळी खुर्दच्या गावच्या प्रवेशद्वारातील शिवमूर्तीला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.