एपीएमसी पोलीस स्थानकात एफआयआर
प्रतिनिधी / बेळगाव
ज्योतीनगर, कंग्राळी खुर्द येथील एक महिला गेल्या 15 दिवसांपासून बेपत्ता झाली आहे. यासंबंधी दोन दिवसांपूर्वी तिच्या पतीने एपीएमसी पोलीस स्थानकात फिर्याद दिली असून पोलीस तिचा शोध घेत आहेत.
सविता सागर मुतगेकर (वय 29) असे तिचे नाव आहे. 25 डिसेंबर रोजी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास आपल्या मुलांना सासरी सोडून आईच्या घरी जावून येण्याचे सांगुन सविता घराबाहेर पडली होती. ती अद्याप परतली नाही.
5 फुट उंची, गहू वर्ण, अंगाने सुदृढ असे तिचे वर्णन आहे. घराबाहेर पडताना सविताने हिरवी साडी परिधान केली होती. वरील वर्णनाच्या महिले विषयी कोणाला माहिती मिळाल्यास 90831-2405250 या क्रमांकाशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.