प्रतिनिधी/ बेळगाव
सीआयडी विभागातील अधिकाऱयांनी शुक्रवारी कंग्राळी खुर्द येथे गांजा विकणाऱया एका युवकाला अटक केली आहे. त्याच्या जवळून 482 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून त्याच्यावर एपीएमसी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
राहुल जोतिबा जाधव (वय 30, रा. महादेव रोड, कंग्राळी खुर्द) असे त्याचे नाव आहे. सीआयडी विभागाचे उपनिरीक्षक लक्ष्मण हुंडरद, जगदीश बागण्णावर, जी. आर. शिरसंगी व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली. बस थांब्याजवळ गांजा विकताना राहुलला अटक करण्यात आल्याचे अधिकाऱयांनी सांगितले.
अंमली पदार्थ विक्री करणाऱयांवर कारवाई करण्यासाठी सीआयडीचा स्वतंत्र विभाग आहे. त्या विभागातील अधिकारी अशा कारवायांवर लक्ष ठेवून असतात. कंग्राळी खुर्द येथे गांजा विक्री सुरू असल्याची माहिती मिळताच अचानक छापा टाकून राहुलला अटक करण्यात आली. एपीएमसी पोलीस पुढील तपास करीत आहेत.