कंग्राळी खुर्द : रविवार दि. 7 मार्च येथे रोजी जंगी कुस्त्यांचे विराट मैदान आयोजित करण्यात आले आहे. कंग्राळी खुर्द येथील बाल हनुमान तालीम मंडळाच्या वतीने लाल मातीतील कुस्ती परंपरा जिवंत ठेवण्यासाठी आणि नवीन होतकरू पैलवानांना प्रोत्साहन देण्यासाठी सदर मैदान भरविण्यात येणार आहे. अलतगा गावच्या माळरानात खडी मशीन परिसरात खास बनविण्यात आलेल्या कुस्ती आखाडय़ात हे मैदान होणार आहे. या मैदानामध्ये कर्नाटक आणि महाराष्ट्रातील अनेक नामवंत पैलवानांच्या चटकदार कुस्त्या होणार आहेत.
या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाची कुस्ती कर्नाटक केसरी पै. संगमेश बिराजदार विरुद्ध पै. सागर मोहलमूर शाहू आखाडा कोल्हापूर, नं. 2 ची कुस्ती पै. रोहित पाटील विरुद्ध महाराष्ट्र चॅम्पियन अभिजित मानकर, नं. 3 ची कुस्ती पै. कीर्तीकुमार बेनके विरुद्ध पै. पवन चिकदिनकोप, नं. 4 ची कुस्ती संकल्प येळवे विरुद्ध पै. नरेंद्र घाटगे, नं. 5 ची कुस्ती प्रेम जाधव विरुद्ध पै. रणजित पाटील इचलकरंजी यांच्यात होणार आहे. याशिवाय अन्य सुमारे 50 कुस्त्या होणार आहेत.
या मैदानामध्ये महिला मल्लांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रथमच महिलांच्या कुस्त्या ठरवण्यात आल्या आहेत. यामध्ये पै. ऐश्वर्या ल. कंग्राळी विरुद्ध पै. प्रिसिना, नं. 2 ची कुस्ती पै. मिनीषा विरुद्ध पै. स्वाती कडोली, नं. 3 ची पै. तनुजा विरुद्ध पै. सोनी लहान कंग्राळी, नं. 4 ची कुस्ती पै. कल्याणी लहान कंग्राळी विरुद्ध पै. लक्ष्मी बस्तवाडी, नं. 5 ची पै. भक्ती कंग्राळी विरुद्ध पै. अमुल्या गोकाक, नं. 6 ची कुस्ती पै. साक्षी विरुद्ध पै. गौतमी ल. कंग्राळी यांच्या चटकदार कुस्त्या होणार आहेत. या कुस्ती मैदानाचे औचित्य साधत कंग्राळी खुर्द गावची सुपुत्री बेळगावची पहिली महिला एनआयएस कोच पूनम संजय शिवनगेकर हिचा जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. मैदान यशस्वी करण्यासाठी कुस्ती संघटनेने कार्याध्यक्ष अनंत निलजकर, अध्यक्ष पै. एम. आर. पाटील ऑलिंम्पिकपटू, उपाध्यक्ष कर्नाटक केसरी पै. कृष्णा पाटील, सचिव दिनेश शांताराम मुतगेकर, उपसचिव प्रकाश पाटील, खजिनदार गजानन पाटील, उपखजिनदार वाय. आर. पाटील, तालीम वस्ताद पै. काशीराम पाटील या कार्यकारिणीची निवड केली आहे.