प्रतिनिधी/ बेळगाव
कंग्राळी बुद्रुक येथे घरासमोर उभी करण्यात आलेल्या मोटारसायकलची चोरी झ्घली आहे. 30 डिसेंबर रोजी चोरीचा हा प्रकार उघडकीस आला असून रविवारी यासंबंधी काकती पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
29 डिसेंबरच्या रात्री 10 वाजता केए 22, ईयु 7054 क्रमांकाची बजाज पल्सर मोटारसायकल प्रद्युम्न देवकरी यांनी घरासमोर उभी केली होती. त्या मोटारसायकलची चोरी झाल्याचे दुसऱया दिवशी सकाळी उघडकीस आले आहे. काकती पोलीस पुढील तपास करीत आहेत.