ग्रा. पं.अध्यक्ष-पीडीओंनी मुख्यमंत्री बसवराज बोम्मय्या यांच्या हस्ते स्वीकारला पुरस्कार : सलग दुसऱयांदा सन्मान
प्रतिनिधी /बेळगाव
सलग दोन वर्षे महिलास्नेही पुरस्कार प्राप्त करणाऱया कंग्राळी बुद्रुक ग्राम पंचायतीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. 2020-21 सालातही कंग्राळी बुद्रुकला हा मान मिळाला होता. आता 2021-22 सालचा महिलास्नेही पुरस्कारही याच ग्राम पंचायतीला मिळाल्याने बेळगाव तालुक्मयाचे नाव उज्ज्वल झाले आहे. सोमवारी या ग्राम पंचायतीला मुख्यमंत्री बोम्मय्या यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
राज्यातील महिलास्नेही ग्राम पंचायत बनण्याचा मान कंग्राळी बुद्रुकला मिळाला. सोमवार दि. 14 मार्च रोजी बेंगळूर येथील विधानसौधमध्ये मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या हस्ते ग्रा. पं. अध्यक्षा संध्या चौगुले व पीडीओ जी. आय. बरगी यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी विधानपरिषदेचे सभापती बसवराज होरट्टी, ग्रामीण विकास व पंचायत राज खात्याचे मंत्री के. एस. ईश्वराप्पा, एल. के. अतिक उपस्थित होते.
दरवर्षी राज्यातील विविध ग्राम पंचायतींना उत्तम काम केल्याबद्दल पुरस्कार वितरित करण्यात येतो. राज्य सरकारने उद्योग खात्रीतून सर्वाधिक महिलांना काम मिळवून देणारी ग्राम पंचायत म्हणून कंग्राळी बुद्रुकची निवड केली होती. त्यामुळे सलग दुसऱया वषीही या ग्राम पंचायतीने महिलास्नेही पुरस्कार मिळविला असून यामुळे समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
कंग्राळी बुद्रुक ग्राम पंचायतीने 2021-22 सालात उद्योग खात्रीतून महिलांना मोठय़ा प्रमाणात काम दिले आहे. या योजनेमुळे गावातील तसेच तालुक्मयातील अनेक गावांमध्ये विकास साधण्यात आला आहे. तलाव, नाले खोदाई करून पाणी अडविण्यासाठी आणि ते जमिनीत झिरपण्यासाठी मोठे प्रयत्न करण्यात आले आहेत. परिणामी याचा फायदा शेतकऱयांना होणार आहे. यामुळेच या ग्रामपंचायतीचा बेंगळूर येथे सन्मान करण्यात आला. परिणामी या पुरस्कारामध्ये सर्व नागरिकांचाही समावेश आहे. त्यामुळे सर्वांचे आभारही मानण्यात आले.