वार्ताहर / कंग्राळी बुद्रुक
कंग्राळी बुद्रुक व गौंडवाड ग्राम पंचायतीच्या 22 डिसेंबर रोजी झालेल्या निवडणुकीचा निकाल बुधवारी 30 रोजी लागला. यामध्ये बऱयाच नवीन चेहऱयांना अधिक संधी दिली असून काही माजी सदस्यांनी हॅट्ट्रिक केली आहे. अध्यक्ष-उपाध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळय़ात पडणार याकडेच आता सर्वांच लक्ष लागून आहे. एकंदर बहुतांश नवीन चेहऱयांना निवडून आणून त्यांना विकास करण्याची संधी दिली आहे.
कंग्राळी बुद्रुक ग्राम पंचायत कार्यक्षेत्रामध्ये गौंडवाड गावाचाही समावेश आहे. सदर पंचायतीत तेरा वॉर्ड आहेत. कंग्राळी बुद्रुकमध्ये 11 तर गौंडवाडमध्ये 2 वॉर्ड आहेत. सदस्य संख्या 34 आहे. अर्ज माघारीच्या दिवशी वॉर्ड नं. 5 मध्ये दोन, वॉर्ड नं. 3 मध्ये 1, वॉर्ड 6 मध्ये 1 व वॉर्ड नं. 10 मध्ये 1 उमेदवार अशा 5 उमेदवारांची बिनविरोध निवड झाल्यामुळे 29 जागांसाठी ही निवडणूक पार पडली. या निवडणुकीमध्ये अनेक सदस्यांनी सलग दुसऱयांदा, तिसऱयांदा व चौथ्यांदा विजय संपादन करून आपल्या विजयाची घोडदौड कायम राखली आहे.
बिनविरोध निवडून आलेले उमेदवार
वॉर्ड नं. 3 मधून सौ. कोळी, वॉर्ड नं. 5 पूनम जयराम पाटील व नवनाथ हणमंत पुजारी, वॉर्ड 6 सद्याप्पा राजकट्टी, वॉर्ड 10 सौ. पम्मार याप्रमाणे 5 उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे.
विजयी उमेदवार
वॉर्ड क्र. 1-अनिल यल्लाप्पा पावशे, भारता भाऊराव पाटील, सुचिता सुभाष कोळी, वॉर्ड 2-जयराम विठ्ठल पाटील, तानाजी विठ्ठल पाटील, मेनका कोरडे, वॉर्ड 3-यल्लोजी तानाजी पाटील, वॉर्ड 4-रेखा इंडीकर, वॉर्ड 5-पूर्ण बिनविरोध, वॉर्ड 6-उमेश विठ्ठल पाटील, वेदिका अभिजीत पठाणे, वॉर्ड 7-संध्या चौगुले, शकुंतला सूरजित सिंग, दादासाहेब भदरगडे, वॉर्ड 8-प्रदीप कृष्णा पाटील, वंदना कल्लाप्पा चव्हाण (कोनेरी), वॉर्ड 9-सुरेश राठोड, चंद्रव्वा व्हन्नपन्नावर, वॉर्ड 10-कौसरजहाँ बंदेनवाज सय्यद, फकिरव्वा सिद्राई बेळगावी, वॉर्ड 11-बंदेनवाज महंमदहनिफ सय्यद, शमीमबानू आयुबखान पठाण, वॉर्ड 12-कल्पना मल्लाप्पा पवार, रोहिणी मोहन नाथबुवा, वॉर्ड 13-सुजाता सुरेश जठार, बाबू दोडमनी, रेखा विजय सुतार.
सलग दुसऱयांदा निवडून आलेले उमेदवार
दादासाहेब भदरगडे, पूनम जयराम पाटील, चंद्रव्वा व्हन्नपन्नावर, रोहिणी मोहन नाथबुवा, सुजाता सुरेश जठार, कौसरजहाँ बंदेनवाज सय्यद, शमीमबानू आयुबखान पठाण आदी जण सलग दुसऱयांदा निवडून आले आहेत.
गौंडवाड गावावर महिलांचे वर्चस्व
गौंडवाड गावातील दोन वॉर्डासाठी एकूण पाच पदसंख्या आहे. यामध्ये चार महिला तर एक पुरुष पद आहे. यामुळे गौंडवाड गावच्या विकासामध्ये महिलांचाच मोठा सहभाग राहणार आहे.
एकाच कुटुंबात झाले तीन सदस्य
एकाच कुटुंबातील पती-पत्नी व भाऊ अशा तीन जणांनी विजय संपादन केला आहे. जयराम विठ्ठल पाटील हे सलग तीन वेळा निवडून येऊन हॅट्ट्रिक केली आहे तर त्यांची पत्नी पूनम पाटील या सलग दुसऱयांदा निवडून आल्या आहेत.
उमेश विठ्ठल पाटील हे प्रथमच निवडून येऊन या कुटुंबाने एक वेगळा उपक्रम नोंदविला आहे.
पती-पत्नी विजयी
वॉर्ड नं. 10 मधून कौसरजहाँ बंदेनवाज सय्यद या सलग दोन वेळा निवडून आल्या. तर वॉर्ड नं. 11 मधून त्यांचे पती बंदेनवाज महम्मदहनिफ सय्यद हे पहिली वेळ निवडून आले आहेत. यामुळे पती-पत्नी दोघेही विजयी झाले आहेत.