वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
कंग्राळी बुद्रुक व गौंडवाड येथील 13 अंगणवाडय़ांना शासनाकडून व्हील चेअर्स, लहान मुलांच्या खुर्च्या, ट्रेझरी कपाट, टेबल अशा साहित्याचे नुकतेच वितरण करण्यात आले.
सदर साहित्य 14 व्या वित्त आयोग फंडातून मंजूर झाले असल्याचे यावेळी सांगण्यात आले. येथील मराठी शाळेमधील सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रा. पं. अध्यक्षा संध्या चौगुले होत्या.
यावेळी ग्रा. पं. उपाध्यक्ष अनिल पावशे यांच्या हस्ते सरस्वती फोटो पूजन करण्यात आले. साहित्याचे पूजन ग्रा. पं. अध्यक्षा संध्या चौगुले व सदस्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कंग्राळी बुद्रुक व गौंडवाड येथील 13 अंगणवाडी शिक्षिकांकडे वरील साहित्याचे वितरण करण्यात आले.
गरोदर महिला व बालकांना सकस आहाराचे वितरण
गरोदर स्त्रिया व लहान बालकांना शासनाकडून मिळालेल्या सकस आहाराचेही अंगणवाडी शिक्षिकांकडून वाटप करण्यात आले. यावेळी ग्रा. पं. सदस्या मेनका कोरडे, वेदिका पठाणे, शकुंतला सिंग, रेखा इंडीकर, चंद्रव्वा व्हन्नपन्नावर, ग्रा. पं. माजी उपाध्यक्षा रेखा सुतार, अंगणवाडी शिक्षिका व इतर उपस्थित होते.