काकती पोलीस स्थानकात एफआयआर
प्रतिनिधी / बेळगाव
कंग्राळी बुद्रुक येथील एक वृध्द गेल्या आठ दिवसांपासून बेपत्ता झाला आहे. यासंबंधी काकती पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
गुरुनाथ सिध्दाप्पा भांदुर्गे (वय 60, रा. चव्हाट गल्ली, कंग्राळी बुद्रुक) असे त्याचे नाव आहे. दि. 23 सप्टेंबर रोजी 11.30 वाजण्याच्या सुमारास कट्टणभावीला जावून येण्याचे सांगून तो आपल्या घराबाहेर पडला होता. अद्याप घरी परतला नाही म्हणून त्याच्या मुलाने पोलिसांत फिर्याद दिली आहे.
4.6 फुट उंची, गोल चेहरा, गहू वर्ण, अंगाने साधारण असे त्याचे वर्णन आहे. घराबाहेर पडताना या वृध्दाने आपल्या अंगावर पांढरा फुल शर्ट व चॉकलेटी पॅन्ट परिधान केला होता. या वृध्दा विषयी कोणाला माहिती मिळाल्यास काकती पोलीस स्थानकाशी 0831-2405203 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.