वार्ताहर/ कंग्राळी बुद्रुक
कंग्राळी बुद्रुक व गौंडवाड ग्राम पंचायतीच्या एकूण 34 जागांसाठी 95 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. यापैकी 7 उमेदवारांची बिनविरोध निवड झाल्याने 88 उमेदवारांमध्ये चुरशीची निवडणूक होणार आहे. एकूण 13 वॉर्डांसाठी 34 जागा आहेत. यापैकी 11 वॉर्ड कंग्राळी बुद्रुकमध्ये तर 2 वॉर्ड गौंडवाडमध्ये येतात. एकूण 13 वॉर्डांसाठी 136 अर्ज आले होते. यामध्ये 23 जणांनी अर्ज माघारी घेतले आहेत.
एकूण 95 उमेदवारांमध्ये 7 उमेदवार बिनविरोध झाल्यामुळे 88 उमेदवार रिंगणात आहेत. बिनविरोध निवड झालेल्या उमेदवारांनी गुलालाची उधळण व पेढय़ांचे वाटप करून आनंदोत्सव साजरा केला.