प्रतिनिधी/ बेळगाव
शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान शाखेच्यावतीने गुरुवार दि. 3 पासून धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास पाळणुकीला प्रारंभ करण्यात आला. फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते अमावस्येपर्यंत बलिदान मास पाळला जातो. या काळात आपल्या आवडत्या पदार्थांचे सेवन वर्ज्य करतात, अनवाणी चालतात, मुंडण केले जाते, असे कंग्राळी बुद्रुक येथील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान शाखेच्या धारकऱयांनी सांगितले.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना संपूर्ण महिनाभर अनेक यमयातना देण्यात आल्या. याची जाणीव समस्त हिंदु समाजाला रहावी म्हणून शिवप्रतिष्ठानच्यावतीने धर्मवीर बलिदान मास गांभीर्याने पाळला जातो. गुरुवारी बलिदान मासाचा पहिला दिवस यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ासमोर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना आदरांजली वाहण्यात आली.
प्रारंभी प्रेरणा मंत्र म्हणून महाराजांना अभिषेक घालण्यात आला. यावेळी निरंजन जाधव, शंकर पाटील, किरण कोळी, योगेश पवारसह धारकऱयांच्या हस्ते पूजन करण्यात आले. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज की जय’ अशा घोषणा देऊन वातावरण शिवमय केले.
यावेळी निरंजन जाधव, शंकर पाटील, योगेश पवार, प्रवीण कोनेरी, आकाश पाटील, किरण कोळी, सुजीत चौगुले, गणेश अष्टेकर, संग्राम राणेसह शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी व ग्रामस्थ उपस्थित होते..